ICHMH51NEWS.IN
9921600800

बाजार नियोजनाचा आमदारांचा ‘प्लॉप शो’कोर्टाच्या निर्णयाचा अवमान; आयुक्तांचा यु टर्न, नागरिकांमध्ये संताप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बाजार नियोजनाचा आमदारांचा ‘प्लॉप शो’कोर्टाच्या निर्णयाचा अवमान; आयुक्तांचा यु टर्न, नागरिकांमध्ये संताप

इचलकरंजी –
शहरातील दिवाळी बाजार नियोजनाचा फज्जा उडत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा उघडपणे अवमान झाल्याने आमदार आणि आयुक्त यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

९ ऑक्टोबर रोजी आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत आपत्कालीन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून बाजार थोरात चौक, नामदेव मैदान आणि आवळे मैदान येथे भरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु त्याच दिवशी जयहिंद मंडळ परिसरातील व्यापाऱ्यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे दाद मागितल्यानंतर आमदारांनी भेट देत आयुक्तांचा निर्णय बदलला.आयुक्तांनी आमदारांच्या दबावात यु टर्न घेत कारवाई सौम्य करत कागदोपत्री रेकॉर्डसाठी कारवाई सुरू ठेवली,जे ठरले होते ते मनुष्यबळ आयुक्तांनी पुरवले तर नाहीच ठोस निर्णयापासून पलटी मारण्याची भूमिका कायम ठेवली.

याचिकाकर्ते महेश भिसे यांनी छत्रपती शिवतीर्थ ते गांधी पुतळा येथे बाजार भरवण्यासंदर्भात  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्किट बेंचने छत्रपती शिवतीर्थ ते गांधी पुतळा रस्त्यावर आपत्कालीन सेवांना अडथळा होणार असल्याने बाजार भरवण्यास बंदी घातली. तरीही मागील तीन दिवस या रस्त्यावर बाजार भरलाच.

दरम्यान, इचलकरंजी फेस्टिव्हलदरम्यान नाट्यगृह चौकात आमदारांनी केलेली मध्यस्थीही फोल ठरली. दुतर्फा बाजार भरल्याने आमदारांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

वर्षभर कर भरणाऱ्या व महसूल देणाऱ्या व्यापाऱ्यांची अडचण करत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन, आयुक्तांचा यु टर्न आणि आमदारांची संशयास्पद भूमिका यावरून शहरात संताप व्यक्त होत असून, “कार्यसम्राट आमदारांचे नियोजन फसले,स्थानिक वर्षानुवर्षे घरफाळा व भाडे भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान करून मग नेमके काय साधले?” असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा