इचलकरंजीत बेवारस महिलेचा मृत्यू, नातेवाईक शोधासाठी आवाहन
इचलकरंजी
इचलकरंजीतील जवाहरनगर येथील निराधार निवारा केंद्रात आश्रित असलेल्या शोभाताई (वय अंदाजे ६५ वर्षे, पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
सदर महिला सन २०२१ पासून माणुसकी फाऊंडेशनच्या इम्रान शेख व राकीत रॉय यांनी दाखल केल्यानंतर निराधार निवारा केंद्र, जवाहरनगर येथे राहत होत्या. केंद्रामार्फत त्यांचा सांभाळ केला जात होता.
दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी वयोमानानुसार तब्येत बिघडल्याने त्यांना IGM हॉस्पिटल, इचलकरंजी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
IGM हॉस्पिटलकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मयत नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, पो.हवा. नितीन चौथे व पो.कॉ. तुषार सूर्यवंशी हे करीत आहेत.
सदर शोभाताई यांचे नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी असल्यास, कृपया शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे (मो. ९९२३५९१२६५) यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







