ICHMH51NEWS.IN
9921600800

खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना अवघ्या आठ तासांत अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना अवघ्या आठ तासांत अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

इचलकरंजी:
कबनूर ता. हातकणंगले येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना अवघ्या आठ तासांच्या आत अटक करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा माहितीनुसार, २८  ऑक्टोबर रोजी पहाटे १ ते २ वाजण्याच्या सुमारास कबनूर येथील इंदिरा हौसिंग सोसायटीतील  अभिनंदन जयपाल कोल्हापूरे (वय 44) यांचा पंकज संजय चव्हाण व त्याचे ३-४ साथीदार यांनी खून केला. आरोपी व मयत यांच्यात वैशाली हॉटेल येथे भांडण झाले होते. त्यानंतर आरोपींनी “पोलीस ठाण्यात घेऊन जातो” असे सांगून मयताला घरातून बाहेर नेले. त्यानंतर त्यांच्या मोटरसायकलवर बसवून कबनूर-कोल्हापूर रोडवरील हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळ नेऊन सिमेंटचा गोलाकार पाईप डोक्यात घालून गंभीर दुखापत करून त्याचा खून केला.

या घटनेबाबत मयताचा भाऊ डॉ. अभिषेक जयपाल कोल्हापूरे (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना आरोपींचा सत्वर शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या सहकार्याने विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे चौंडेश्वरी फाटा, चिपरी येथे सापळा रचण्यात आला. त्या ठिकाणी आरोपी पंकज चव्हाण व त्याचे साथीदार येणार असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली.पंकज संजय चव्हाण (वय २७, रा. वारणा शॉपी जवळ, कबनूर),रोहित जगन्नाथ कोळेकर (वय २४, रा. कागल),विशाल राजू लोंढे (वय ३१, रा. लालनगर, इचलकरंजी),आदित्य संजय पवार (वय २१, रा. लालनगर, इचलकरंजी) यांना अटक करण्यात आली.चौकशीत आरोपींनी हॉटेल वैशाली येथे झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अभिनंदन कोल्हापूरे यांचा खून केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत.

या यशस्वी कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरेअतिष म्हेत्रे, तसेच पोलीस अंमलदार महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले आणि सुरेश राठोड (सायबर पोलीस ठाणे) यांनी सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अटक केलेले खुनातील आरोपी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा