ICHMH51NEWS.IN
9921600800

सलोख्याची दिवाळी : संविधान परिवारतर्फे ‘चांदतारा मस्जिद’ अभ्यासिकेत अनोखा उपक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सलोख्याची दिवाळी : संविधान परिवारतर्फे ‘चांदतारा मस्जिद’ अभ्यासिकेत अनोखा उपक्रम

इचलकरंजी:
“दिवाळी सण प्रकाशाचा आणि फराळ सलोख्याचा” — या भावनेला मूर्त स्वरूप देत इचलकरंजी येथील चांदतारा मस्जिदच्या अभ्यासिकेत ‘सलोख्याची दिवाळी’ हा सद्भाव मंच अंतर्गत उपक्रम संविधान परिवारतर्फे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इम्रान हावेरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संवेदना फेलो तथा राष्ट्र सेवा दलाचे संघटक रोहित दळवी यांनी प्रास्ताविक करत उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. अभ्यासिकेचे संचालक हाजी सादिक जमादार यांनी या उपक्रमाचे स्वागत करत हिंदू-मुस्लीम ऐक्याचा धागा अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर यांनी सलोखा आणि सद्भावाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “हिंदू-मुस्लीम ऐक्याची गरज आज अधिक आहे. समाजात फुटी किंवा विद्वेष पसरवणाऱ्यांचा खरा फायदा कोणाला होतो, हे लोकांसमोर आणण्याची वेळ आली आहे. पुढील पिढीपर्यंत हे विष जाणार नाही यासाठी संवाद आणि समज निर्माण करणे आवश्यक आहे.”

या प्रसंगी सृजन प्रकाशन वतीने अभ्यासिकेला ग्रंथभेट देण्यात आली. तसेच तरुणाईला राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ समजावून देणारे यदुनाथ थत्ते लिखित ‘प्रतिज्ञा’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
जाफर मुजावर यांनी सद्यस्थितीत सद्भावासोबतच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्र सेवा दल इचलकरंजीचे अध्यक्ष अनिल होगाडे यांनी भूषवले. कार्यक्रमाचे सूत्रसंयोजन प्रा. अमित कोवे यांनी केले तर शहानूर कमालशहा यांनी आभार मानले.

कार्यक्रमास इकबाल देसाई, मुबारक मुजावर, शरद वास्कर, शहानूर कमालशहा, प्रफुल्ल आवळे, इब्राहिम मुजावर, अशोक वरुटे, अॅड. तौफिक नाईकवाडे, साद चांदकोटी, वाजीद तासगावे, सरफराज खलिफा, शब्बीर शिरोळे, ओम कोष्टी, मखतूम जमादार, जुबेर मागलेकर, निलेश बनगे, लुकमान समडोळे आणि दामोदर कोळी उपस्थित होते.

शेवटी सर्व उपस्थितांनी फराळाचा आस्वाद घेत दिवाळीचा सलोख्याचा संदेश दिला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा