एस.टी. बसमध्ये महिलेकडून दागिन्यांची चोरी
इचलकरंजी
इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवासादरम्यान अनोळखी महिलेनं बसमध्येच प्रवासी महिलेकडून सोन्याचे दागिने लंपास केले. फिर्यादी सौ. रेखा यादव घोदे (वय 40, रा. कुंभोज) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे एक लाख रुपये असून त्यात सोन्याचा लक्ष्मी हार व मंगळसूत्राचा समावेश आहे. तपास पो. हे.कॉ. चोथे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







