इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी आणि स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी –
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त (राष्ट्रीय संकल्प दिवस) तसेच स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (राष्ट्रीय एकता दिवस) अभिवादन कार्यक्रम पार पडला.
महानगरपालिका सभागृहात आयोजित या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या हस्ते स्व. इंदिरा गांधी आणि स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त उपस्थितांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.
कार्यक्रमास मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, शिवतीर्थ स्मारक समितीचे अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव, कृती समिती अध्यक्ष के.के. कांबळे, नौशाद जावळे, उपलेखा परीक्षक धनंजय पळसुले, क्रीडा अधिकारी संजय शेटे, सचिन खोंद्रे, अशोक कमते आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व. इंदिरा गांधी आणि स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







