डी के ए एस सी महाविद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी खेळात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित विभागीय मैदानी स्पर्धा डेरवण या ठिकाणी अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या. या झालेल्या स्पर्धेमध्ये डी के ए एस सी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अतुलनीय यश प्राप्त केले. निकिता माने – हॅमर थ्रो खेळ प्रकारात सुवर्ण पदक, रेहान पटाईत – उंच उडी (19 वर्षाखालील मुले) सुवर्ण पदक. स्वानंद कुंभोजे – थाळी फेक मध्ये सुवर्ण पदक, अथर्व सातपुते – उंच उडी ( 17 वर्षाखालील मुले) सुवर्ण पदक. खेळाडूंनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली.
खेळाडूंच्या या कामगिरीचे प्राचार्य डॉ एस के खाडे यांनी कौतुक करत अभिनंदन केले. यावेळी बापूजी साळुंखे कॉलेज मिरजचे प्राचार्य डॉ. ए.एन.पाटील व. मा. प्राचार्य डॉ एस एम मणेर हे उपस्थित होते. खेळाडूंना क्रीडा संचालक श्री. भोई विनायक, श्री लगिवाले मुजफ्फर यांचे मार्गदर्शन लाभले तर श्री. सुभाष माने सर, श्री. थोरवत सर, श्री. शाम कांबळे सर यांचे प्रशिक्षण मिळाले.
या सर्व खेळाडूंना पुढील कामगिरीसाठी महाविद्यालयाचा प्राध्यापक स्टाफ, प्रशासकीय स्टाफ व विद्यार्थी – विद्यार्थिनींनी शुभेच्छा दिल्या
राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंसमवेत प्रा.एस के खाडे व शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







