ICHMH51NEWS.IN
9921600800

पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला – अल्पवयीन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला – अल्पवयीन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजी :
इचलकरंजीतील सहकारनगर परिसरात जुन्या वादाच्या रागातून एका तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन संशयिताविरुद्ध इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advt

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश उर्फ रविराज जनार्दन कांबळे (वय ३०, व्यवसाय फॅब्रिकेशन, रा. सहकारनगर साइट नं. १०२, इचलकरंजी) हे शुक्रवारी रात्री घरी जात असताना सहकारनगर येथील सरकारी संडास चौकात जुन्या वादाच्या रागातून अल्पवयीन संशयिताने मागून येत “तुला सोडणार नाही” असे म्हणून लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात प्रहार केला.

या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा