गंगामाई गर्ल्स हायस्कूलची तिहेरी क्रीडा कामगिरी
इचलकरंजी :
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या तीन विद्यार्थिनींनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करत विद्यालयाचा गौरव वाढवला आहे. शालेय शासकीय कुराश स्पर्धेत प्राची राजू केंगार (इयत्ता ११वी, आर्ट्स) हिची ७० किलो वजन गटात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा बालेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे.
त्याचबरोबर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत उत्तुंग खेळी करत चैत्राली अवधूत वडेकर हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या पुढील फेरीसाठी निवड झाली आहे. तसेच खो-खो क्रीडा प्रकारातच स्वरा राजेश दौंडे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी परभणी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशामागे श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा. श्रीनिवास बोहरा शेठ, चेअरमन श्री कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदय लोखंडे, ट्रेझरर श्री महेश बांदवलकर, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारोतराव निमनकर व सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. व्ही. एस. लोटके, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी,पर्यवेक्षक एस. एस. कोळी, पर्यवेक्षिका एन. एम. कांबळे,ज्येष्ठ शिक्षक डी. डी. कोळी यांनी तिन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
जिमखाना प्रमुख बी. एस. माने, क्रीडा शिक्षक के. ए. पाटील, व्ही. के. पाटील तसेच कोच अभिजीत बचाटे, कोच अमोल मेटे, अवधूत वडेकर आणि राजेश दौंडे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थिनींना झाला.
विद्यालयीन क्रीडा क्षेत्रातील हा तिहेरी यशाचा अभिमान असून तिन्ही विद्यार्थिनींवर पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा सन्मान करताना मुख्याध्यापिका काझी व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







