इचलकरंजी महानगरपालिकेत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आदिवासी समाजाचे महानायक व स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त नंदू परळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमास सहायक आयुक्त नितीन बनगे, प्रदीप झमरी, गौस जमादार, उमाजी कणसे, अशोक कमते, सचिन शेडबाळे, सचिन व्हलेर, चंद्रकांत साळी आदी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बिरसा मुंडा यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या कार्यातून समाजाने प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
बिरसा मुंडा यांना अभिवादन करताना महापालिका कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







