ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महापालिकेच्या फेर आरक्षणात १२ जागांचा फेरबदल; इच्छुकांमध्ये नाराजी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महापालिकेच्या फेर आरक्षणात १२ जागांचा फेरबदल; इच्छुकांमध्ये नाराजी

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेची आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. मात्र सोडतीदरम्यान प्रशासनाकडून झालेल्या गंभीर त्रुटी उघड झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने फेर आरक्षण सोडत घेण्याचे आदेश दिले. नव्या सोडतीमध्ये तब्बल १२ प्रभागांमध्ये बदल झाले असून या फेरबदलामुळे अनेक इच्छुकांची निराशा झाली आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उमेदवारांच्या अपेक्षांना धक्का बसला असून निवडणूक गणितात मोठा बदल झाला आहे. फेर आरक्षणानुसार प्रभाग 2 (अ)मध्ये ओबीसी खुला ऐवजी ओबीसी महिला, तर प्रभाग 2(क) मध्ये सर्वसाधारण महिला ऐवजी सर्वसाधारण असे आरक्षण झाले आहे. प्रभाग 5 (अ) मध्ये ओबीसी महिला ऐवजी ओबीसी खुला, तर 5(क) मध्ये सर्वसाधारण ऐवजी सर्वसाधारण महिला असा बदल करण्यात आला आहे. प्रभाग 7  (ब)मध्ये ओबीसी खुला ऐवजी ओबीसी महिला, तर 7(क) मध्ये सर्वसाधारण महिला ऐवजी सर्वसाधारण असे आरक्षण झाले आहे. प्रभाग 11 (अ)मध्ये ओबीसी महिला ऐवजी ओबीसी खुला, तर 11(क) मध्ये सर्वसाधारण ऐवजी सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित झाले आहे. प्रभाग 12 (अ)मध्ये ओबीसी महिला ऐवजी ओबीसी खुला, तर त्याचप्रमाणे 12(क) मध्ये सर्वसाधारण ऐवजी सर्वसाधारण महिला प्रभाग क्र 14 (अ) मध्ये ओबीसी खुला ऐवजी ओबीसी महिला, तर 14(क) मध्ये सर्वसाधारण महिला ऐवजी सर्वसाधारण असे बदल करण्यात आले आहेत. या सर्व बदलांमुळे इच्छुक उमेदवारांचे प्रभाग बदलले असून अनेकांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे वातावरण गरम झाले आहे. फेर आरक्षणामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोलीस बंदोबस्तात फेरसोडत

आयुक्त पल्लवी पाटील या आरक्षण सोडतीदरम्यान अतिशय तणावात दिसत होत्या तर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,सोडत संपल्यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी तातडीने नाट्यगृह सोडले.

सोडत काढताना महापालिका कर्मचारी व आयुक्त पल्लवी पाटील
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा