ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे यांना अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे यांना अभिवादन

इचलकरंजी  ─

इचलकरंजी शहराचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या नाट्यगृहाजवळील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी सहायक आयुक्त नितीन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी, संजय कांबळे, अशोक कमते, महेश बुचडे, दिलीप मगदूम आदी अधिकारी उपस्थित होते.

शहराच्या विकासात आणि औद्योगिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या योगदानाची आठवण यानिमित्ताने करण्यात आली.

 

जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे यांना अभिवादन करताना अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा