डि.के.ए.एस.सी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित दत्ताजीराव कदम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला.
दि. 26 नोव्हेंबर – भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाची प्रत व संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी प्राचार्य प्रा. व्ही. पी. पाटील आणि प्रा. डी. ए. यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत डॉ. मोहन कांबळे यांनी केले, तर उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. विशाल कांबळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ. सुभाष जाधव, डॉ. प्रभा पाटील, डॉ. अशोक बोगुलवार, डॉ. सुनील भोसले, डॉ. अरुण कटकोळे, डॉ. दिगंबर नागर्थवार यांच्यासह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन प्रबंधक श्री रघुनाथ जोग, अधीक्षक श्री प्रकाश कुराडे, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम राज्यशास्त्र विभागातील डॉ. मोहन कांबळे व डॉ. मीनाक्षी मिणचे यांच्या नियोजनातून यशस्वीपणे पार पडला.
संविधान दिन साजरा करताना प्रा. डॉ.एस के खाडे व प्राध्यापक वृंद
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







