चंदूर येथे छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
इचलकरंजी :
शाहूनगर, गल्ली क्रमांक १२ चंदूर (ता. हातकणंगले) येथे सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून महेर इरफान मुजावर (वय २२ वर्षे) विवाहितेने आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सलीम बाबू कडगे (वय 52, रा. शाहूनगर, चंदूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, (महेर) हिच्यावर चिकोडी येथील तिचा पती इरफान निजाम मुजावर तसेच जाऊ समिना मुजावर, सासू चाँदबी मुजावर, नणंद शाहिदा,फारुख रा कोल्हापूर यांनी सातत्याने अत्याचार केला.
मयत महिलेला घरातून ५ लाख रुपये आणण्यासाठी सतत दबाव टाकला जात होता. या कारणावरून तिच्यावर वारंवार मारहाण, मानसिक छळ आणि नांदायला न नेण्याचा त्रास केला जात होता. या अत्याचाराला कंटाळून मयत महिलेनं शनिवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
फिर्यादींच्या जबाबावरून आरोपी १ ते ५ यांनीच मयत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
प्रकरणाचा तपास पो.स.इ. भोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्रभारी अधिकारी पो.नि. गायकवाड आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







