रोटरी सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब इचलकरंजी यांच्या वतीने आदर्श माता व सखी-सहेली पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न..
इचलकरंजी
रोटरी प्रोबसच्या वतीने स्वर्गीय सौ. मंजिरी प्रकाश सातपुते यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षाप्रमाणे आदर्श माता व सखी-सहेली पुरस्कार अनुक्रमे श्रीमती पार्वती शांताराम आमाशी व सौ. अंजली सुर्यकांत चुडमुंगे याना देऊन सन्मानित करण्यात आले, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे, प्रमुख मान्यवर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. विभा सुनिल पाटणी व सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. पुनम संपतराव माने-जाधव यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला, प्रमुख उपस्थिती रोटरी डिस्ट्रिक्टचे सेक्रेटरी व संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते यांची होती,
स्वागत सेक्रेटरी श्री किरण कटके यानी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष श्री सुनिल कोष्टी यानी केले.
प्रमुख अतिथी सौ. विभा पाटणी यांचा परीचय सौ.शारदा कवठे यानी केला तर पुनम माने यांचा परीचय सौ. विणा श्रेष्ठी यानी करुन दिला दोन्ही मान्यवरांचा सत्कार सौ. निर्मला मोरे यानी केला.
पुरस्कार विजेत्या सौ. अंजली सुर्यकांत चुडमुंगे यांचा परीचय श्री जुगलकिशोर तिवारी यानी करुन दिला, आदर्श माता पुरस्कार विजेत्या श्रीमती पार्वती शांताराम आमाशी यांचा परीचय सुनिल कोष्टी यानी करुन दिला. या नंतर दोन्ही पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
मनोगतामध्ये श्री प्रकाशराव सातपुते यानी पुरस्काराची विस्तृत माहित सांगितली, तसेच रोटरी प्रोबसच्या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली, प्रमुख अतिथी सौ. विभा पाटणी यानी रोटरी प्रोबसच्या उपक्रमाचे कौतुक केले व जेष्ठांचे अभिनंदन केले व यामधुन आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे त्यानी नमुद केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. पुनम माने – जाधव यानी रोटरी प्रोबसच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी मत व्यक्त केले.
पुरस्कार प्राप्त सौ. अंजली चुडमुंगे यानी आपल्या आजवरच्या जीवन प्रवासाविषयी सांगितले. आदर्श माता पुरस्कार विजेत्या श्रीमती पार्वती आमाशी यांच्या वतीने त्यांचे पुत्र सुरेश आमाशी यानी आपल्या मातोश्रीच्या संघर्षाची माहिती दिली. पुरस्कार प्राप्त दोन्हीही मान्यवरानी पुरस्कार देउन सन्मान केल्या बद्दल रोटरी प्रोबस, पदाधिकारी या सर्वाना धन्यवाद दिले, आभार व्यक्त केले.
याप्रसंगी क्लबच्या सदस्या सौ. बिस्मिला शेख याना महाराष्ट्र राज्य योगासन सादरीकरण प्रथम पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा व त्यांच्या प्रशिक्षक सौ. विणाताई श्रेष्ठी यांचा प्रमुख मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सद्स्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला, नवीन झालेल्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच दि. 18-19 नोव्हेंबर रोजी क्लबच्या वतीने जेष्ठ स्त्री -पुरुषांची सहल गणपती पुळे, कोकण दर्शन याठिकाणी जाउन आली त्याच्या बद्दल आयोजक श्री प्रकाशराव सातपुते, सुनिल कोष्टी, किरण कटके, व प्रमोद लाटणे यांचा सत्कार श्री आनंदा मेटे, अनिल ज्वारे, बाबासाहेब पाटील, विश्वनाथ एकार यांच्या हस्ते करण्यात आला, शेवटी आभार सह-सेक्रेटरी सौ. संगीता लडगे यानी मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. शारदा कवठे यानी केले.
यासमारंभास माजी अध्यक्ष अँड.विश्वासराव चुडमुंगे, एम.के,कांबळे, प्राजक्ता होगाडे,जयश्री चौगुले, रामचंद्र निमणकर, अशोक पाटील, जयप्रकाश शाळगावकर, डाँ. कुबेर मगदूम, काशिनाथ जगदाळे, गजानन शिरगुरे, डी . यम.बिरादार,मल्लीकार्जुन तेग्गी, रामदास कोळी, बापुसाहेब घुले, रमेशभाई पंड़या, कैलास तिवारी ,वैभव डोंगरे, हेमंत कवठे, लक्ष्मण घंटा, सनतकुमार नांदणीकर, डेझी कुरणे, मंजुळा कांबळे, शोभन स्वामी, गीता लाटणे, कविता कटके, सुरेखा मगदूम, माया होगाडे, आनंदी हजारे, प्रमोदिनी देशमाने, विजय बनसोडे, अशोक देगावकर, बालमोहन कित्तुरे, श्रीकांत कंगळे, रोहन सातपुते, राहुल सातपुते,राजश्री वाटेगावे, सुनंदा कांबळे, शालीनि जगदाळे, मंगल डोंगरे, निता दोड्डण्णावर, माधुरी कुलकर्णी, जगन्नाथ पोटे, जयश्री चौगुले आशालता पाटील, शशिकला ,दिपाली जाधव, ऐश्वर्या सातपुते, तेजस सातपुते,रेखा कांबळे,सुभाष आमाशी,संदीप बिडकर,कलावती आमाशी, भारती आमाशी, दिपाली कोळी ,शाम पांढरे,प्रकाश रूकडे,इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने हजर होते.
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने आदर्श माता व आदर्श सखी पुरस्कार प्रदान करताना प्रकाश सातपुते, पुनम माने,सुनील कोष्टी व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







