धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचे आज आगमन; इचलकरंजीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.
इचलकरंजी :
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे काम पूर्णत्वास आल्याची माहिती देण्यात आली आहे. ही भव्य मूर्ती ३ डिसेंबर रोजी इचलकरंजीत आगमन करणार असून शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज ३ डिसेंबर २०२५ रोजी मूर्तीचे आगमन व मिरवणूक, तर ५ डिसेंबर २०२५ रोजी विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘श्वासात राजं, ध्यासात राजं’ हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील संगीतमय भव्य कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर ६ डिसेंबर २०२५ रोजी ढोल पथक मानवंदना देणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इचलकरंजी शहर व पंचक्रोशीतील सर्व शिवशंभू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समितीतर्फे करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







