ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत २ ठिकाणी बेकायदेशीर दारु जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत २ ठिकाणी बेकायदेशीर दारु जप्त

इचलकरंजी :

इचलकरंजीमध्ये जवाहरनगर परिसरात दोन स्वतंत्र ठिकाणी बेकायदेशीर दारु जप्त करण्यात आली. पहिल्या प्रकरणात जटप्पा हनुमंत धोत्रे (वय ६५, दणाणे हॉस्पिटलशेजारी, जवाहरनगर) यांनी स्वतःच्या फायद्यासाठी १८ लिटर गावठी हातभट्टीची दारु ठेवून विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून १८० मिली सॅम्पलसाठी काढण्यात आली. एकूण मुद्देमालाची किंमत १८०० रुपये होती.

दुसऱ्या प्रकरणात सिताराम बंडोपंत निकम (वय ३९, विवेकानंदनगर, कोरोची) यांनी डेक्कन भाजी मार्केट जवळ मोमिन चिकन दुकानलगत बेकायदेशीर दारु ठेवली होती. पोलीस तपासात १४ लिटर गावठी हातभट्टीची दारु व १८०मिली सॅम्पलसाठी घेण्यात आली  एकूण मुद्देमालाची किंमत १४०० रुपये आहे.

दोन्ही प्रकरणी गुन्हा  नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पो.स.इ. साने आणि सहा. फौजदार कसेकर प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी  गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा