ICHMH51NEWS.IN
9921600800

सुनिल पाटील मित्र परिवारातर्फे ७ डिसेंबर रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. केदार टाकळकर यांचे व्याख्यान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सुनिल पाटील मित्र परिवारातर्फे ७ डिसेंबर रोजी दहावीच्या
विद्यार्थ्यांसाठी प्रा. केदार टाकळकर यांचे व्याख्यान

इचलकरंजी:
सुनिल पाटील मित्र परिवारच्या वतीने आयुष्यातील महत्वाचा पहिला टप्पा असलेल्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना परिक्षेच्या शेवटच्या टप्प्यातील तयारी व परिक्षा देताना घ्यावयाची काळजी व करावयाची तयारी या संदर्भात ‘एसएससी तयारी मार्कांची भरारी’ अंतर्गत पुणे येथील टाकळकर क्लासेसचे प्रा. केदार टाकळकर सर यांचे रविवार ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे व्याख्यान आयोजित केले आहे.
सुनिल पाटील मित्र परिवार अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक व नागरिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा दिल्या जात असतात. त्याच अनुषंगाने इयत्ता १० वीमधील मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत शेवटच्या दोन महिन्यांमध्ये अभ्यास कसा करावा?, सराव कसा करावा?, प्रकृतीची काळजी कशी घ्यावी?, घरातील वातावरण कसे ठेवावे?, वाचन आणि पाठांतर कधी करावे?, लिखाणाचा सराव कधी करावा?, अभ्यास करताना बैठक व्यवस्था कशी असावी? आदी संदर्भातील माहिती देणारा तसेच ’उत्तरपत्रिका लिहिण्याचे कौशल्य’ या विषयावरील मार्गदर्शन त्यामध्ये प्रश्‍नाचे उत्तर नेमके कसे लिहायचे?, एका ओळीत किती शब्द लिहावेत?, प्रश्‍न कोणत्या क्रमाने सोडवावेत?, महत्वाच्या शब्दांना अधोरेखित करण्याचे किंवा बॉक्समध्ये लिहिण्याचे काय महत्व असते?, समास कसे आखावेत?, कोणत्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नये?, पेन कोणती वापरावी? अशा विद्यार्थ्यांच्या मनात कल्लोळ निर्माण करणार्या प्रश्‍नांची उत्तरे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तयारी करण्यासाठी व परीक्षा देताना मदत व मोलाचे ठरणारे मार्गदर्शन केदार टाकळकर हे करणार आहेत. या मार्गदर्शनाचा इयत्ता १० वी मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुनिल पाटील मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
याप्रसंगी सुनिल पाटील, चंद्रकांत पाटील, राजेंद्र निंबाळकर, संजय कुडचे, महावीर खवाटे, विजय गिरमल, अतुल बावणे, खलील मैंदर्गी, विश्वास माने आदी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा