कन्या महाविद्यालयात दोन दिवसीय संशोधन कार्यशाळा उत्साहात संपन्न.
इचलकरंजी:
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीच्या मानसशास्त्र विभाग आणि नाईट कॉलेज, इचलकरंजी यांच्या सामंजस्य करारांतर्गत दोन दिवसीय संशोधन कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कागलचे डॉ.अमोल कांबळे लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय? संशोधन समाजासाठी का गरजेचे असते, या संदर्भात तसेच संशोधन पद्धती व संशोधन लेखन या विषयांवर मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये संशोधन पद्धती व संशोधन लेखन कसे केले जाते, या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कन्या महाविद्यालय व नाईट कॉलेज, इचलकरंजी येथील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ. त्रिशला कदम यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत केले. त्यांनी सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी यासाठी अशा कार्यशाळा घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.
त्याचबरोबर मानसशास्त्र विभागामध्ये घेतलेल्या स्मार्ट टीव्हीचे उद्घाटन प्रमुख वक्ते डॉ.अमोल कांबळे, प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. धीरज शिंदे आणि नाईट कॉलेज इचलकरंजीचे विभाग प्रमुख डॉ. जीवन पाटील उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले तर आभार प्रा. उदय कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन कु. सोनाली यादव आणि कु.सानिका भिलवडे यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थिनी, कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.

प्रा अमोल कांबळे मार्गदर्शन करताना
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800