ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे ऐतिहासिक आगमन; प्रथमदर्शन सोहळ्यात उत्साहाची मुक्त उधळण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे ऐतिहासिक आगमन; प्रथमदर्शन सोहळ्यात उत्साहाची मुक्त उधळण

इचलकरंजी :
कॉ के एल मलाबादे चौकात स्थापन होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे आगमन होताच कबनूर आणि इचलकरंजी परिसर इतिहासप्रेमाने उजळून निघाला. बुधवारी दुपारी कबनूर येथे झालेल्या प्रथमदर्शन सोहळ्यात मंत्रोच्चार, शंखनाद, पुष्पवृष्टी आणि आतषबाजीतून पुतळ्याचे पूजन व अनावरण करण्यात आले. क्षणभरातच परिसर “छत्रपती संभाजीराजे की जय!” घोषणांनी दुमदुमून गेला.

पंधराशे किलो ब्राँझपासून साकारलेला ११ फूट उंच, तेजस्वी आणि भव्य असा हा पुतळा मोरेवाडी येथील मुर्तीकारांनी अत्यंत बारकाईने घडवला आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समितीतर्फे मलाबादे चौक, शंभुतीर्थ येथे पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे.

प्रथमदर्शन सोहळ्यात माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, सरपंच सुलोचना कट्टी, शिवसेना जिल्हाध्यक्ष रविंद्र माने, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रतिनिधी गजानन महाजन, प्रसाद जाधव,अरविंद माने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. क्रेनच्या सहाय्याने वस्त्रावरण काढताच झालेला शंखनाद व जयघोष सर्वांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला.

यानंतर पुतळ्याची मिरवणूक कबनूरहून शहरात दाखल झाली. मार्गावर रांगोळ्या, पुष्पवृष्टी, संभाजी महाराजांच्या जीवनावरील दृश्य प्रक्षेपण यामुळे मिरवणूक अधिक देखणी झाली. राजर्षी शाहू महाराज चौकात पोहोचताच नागरिकांच्या गर्दीत आणखी वाढ झाली. रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत मिरवणुकीचे स्वागत केले.

छ.संभाजीमहाराज पुतळा आगमन झाले तो क्षण

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा