ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत पहिला महापौर भाजपचाच,महायुतीने निवडणुक लढवण्यावर भर-मंत्री चंद्रकांत दादा पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत पहिला महापौर भाजपचाच,महायुतीने निवडणुक लढवण्यावर भर-मंत्री चंद्रकांत दादा पाटील

इचलकरंजी:

इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची कोअर कमिटी बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. इचलकरंजीचा पहिला महापौर भाजपचाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत महायुतीने निवडणूक लढवण्यावर भर देण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला आ. राहुल आवाडेमाजी मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर कोअर कमिटीसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली.

बैठकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासोबत युती करण्यावर प्राथमिक सहमती व्यक्त करण्यात आली. यानुसार माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि प्रकाश आवाडे हे शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्याशी चर्चा करणार आहेत, तर अशोकराव स्वामी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोकराव जांभळे यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली.

भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी सोमवार सायंकाळपर्यंत मंडल अध्यक्षांकडे अर्ज दाखल करावेत, त्यानंतर सर्व अर्जांची छाननी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार आहे. शहरातील मतदारांची पसंती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करून अंतिम उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बैठकीत आ. राहुल आवाडे यांच्या एक वर्षाच्या कामाचा आढावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विविध योजनांची माहिती पीपीटीच्या माध्यमातून घराघरांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणूक विकासाच्या आधारावर लढवण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केला.

बैठकीस मकरंद देशपांडे, आ. राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राजवर्धन नाईक-निंबाळकर, श्रीरंग खवरे, बाळु माने, शशिकांत मोहिते, सुनील पाटील, अशोक स्वामी, मिश्रिलाल जाजू, अलका स्वामी, प्रकाश दत्तवाडे, अनिल डाळ्या यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हाळवणकरांचा कर्तृत्वानुसार सन्मान.

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या कर्तृत्त्वानुसार सन्मान केल्याशिवाय मी गप्प बसणार नसल्याचा उच्चार त्यांनी केला मात्र आमदारकी बाबत स्पष्ट न बोलल्याने कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत पडले आहेत.

बैठकीत बोलताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा