ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी
    इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव , भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्टेशन रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल जवळील अर्ध पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मधील प्रतिमेस उपायुक्त विद्या कदम आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
      याप्रसंगी सहा.आयुक्त रोशनी गोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, सहा.आयुक्त नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, उप लेखापाल रामचंद्र कांबळे, संदीप जोशी, गणेश शिंदे, प्रदीप झमरी, उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर, संभाजी पोवार, उमेश कांबळे, कविता सोळंकी, संजय कांबळे,  प्रतिभा चौगुले, वैशाली पोवार, महेश बुचडे, दिलीप मगदुम, प्रकाश जाधव, लव लाखे, विकास कांबळे , शुभम भोसले, अमृत बिळगीकर, सुनिता कांबळे आदींसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा