ICHMH51NEWS.IN
9921600800

मानसिक त्रासातून महिलेची आत्महत्या

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मानसिक त्रासातून महिलेची आत्महत्या

इचलकरंजी

महालक्ष्मी अंगण, पंचवटी टॉकीज मागे, इचलकरंजी येथे शनिवारी (दि. ६ डिसेंबर) पहाटे एका महिलेनं दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मंजूदेवी जगदीश पारीक (वय ४९) असे मयत महिलेचे नाव आहे.

वर्दीदार जगदीश रामेश्वरलाल पारीक (वय ५१, रा. महालक्ष्मी अंगण, इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून समजते की, मंजूदेवी या मानसिक आजाराने त्रस्त होत्या. पहाटे सुमारास त्यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने आयजीएम हॉस्पिटल, इचलकरंजी येथे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास पो.हे.कॉ. चव्हाण करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा