ICHMH51NEWS.IN
9921600800

मोबाईल हॅक करून १३ लाखांची फसवणूक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मोबाईल हॅक करून १३ लाखांची फसवणूक

इचलकरंजी:

इचलकरंजी येथे अज्ञात सायबर गुन्हेगारांनी एका तरुणाचा मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून तब्बल १३ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वैभव विश्वास पाटील (वय ३०) रा. वाल्मीकीनगर, संतमळा, इचलकरंजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या संमतीशिवाय मोबाईल फोन हॅक करून त्यावरील नेटबँकिंगचा अ‍ॅक्सेस मिळवला.त्यानंतर इंडसइंड बँक, इचलकरंजी शाखेतील खात्यातून ऑनलाईन व्यव्हाराद्वारे  विविध खात्यांवर एकूण १३ लाखांची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास पो.नि. शिवाजी गायकवाड हे करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा