कन्या महाविद्यालयात पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातच्या समान संधी केंद्र आणि स्टॅंडिंग कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Advt

या पालक मेळाव्यामध्ये समाज कल्याण विभागातर्फे कुमारी पूजा धोत्रे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्व पालकांना करून दिली.
पालकांशी सुसंवाद साधने,पालकांना महाविद्यालयाची ओळख व्हावी, महाविद्यालयाच्या प्रशासनाची ओळख व्हावी
त्याशिवाय महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल यांच्या काही विविध योजना आहेत, त्या योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी,
या मेळाव्याचे आयोजन केलेला होते.

यावेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी सर्व पालकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि महाविद्यालयाच्या एकूणच प्रशासन याच्यावरती चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रशासकीय सेवक माननीय श्री मोहन यादव यांनी संपूर्ण शिष्यवृत्ती योजनांची माहिती, फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपस्थितांना करून दिली
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले तर आभार डॉ. धीरज शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.अनुराधा देशटवार यांनी केले.
यावेळी कनिष्ठ विभाग प्रमुख श्रीमती सोनाली बोरगावकर, डॉ सोमनाथ काळे उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी पालक, विद्यार्थिनी, गुरुदेव कार्यकर्ते,प्रशासकीय सेवक,शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

पालक मेळाव्या उपस्थित पालक व शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800