भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुकांचा ओघ,४१५ जणांनी नेले अर्ज,एक दिवसाची मुदतवाढ
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांच्या अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जोरात सुरू असून अर्ज जमा करण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढ करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज भाजप कार्यालयात उपलब्ध असून उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहून अर्ज घेणे आणि मंगळवार, ०९ डिसेंबर २०२५ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. आरक्षित जागांसाठी संबंधित दाखल्यांच्या झेरॉक्स प्रती जोडणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी ४१५ अर्ज वितरित करण्यात आले तर ३२५ उमेदवारांनी अर्ज जमा केले आहेत. अर्ज स्वीकारण्याचे काम राजू भाकरे आणि महिला आघाडीच्या रमा फाटक यांनी पार पाडले. प्राप्त सर्व अर्जांची छाननी करून ते प्रदेश पातळीवर पाठवण्यात येणार असून अंतिम निवडीसाठी हे अर्ज मकरंद देशपांडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि आ. राहुल आवाडे यांच्या समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत.
इच्छुकांनी आपले अर्ज भाजप कार्यालयात विस्तारक राजु भाकरे यांच्याकडे जमा केले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







