जयसिंगपूरच्या ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’साठी शिट्टी चिन्ह तात्पुरते आरक्षित.
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीने शिट्टी हे निवडणूक चिन्ह राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली होती.
यड्रावकर चेंबर्स, जयसिंगपूर येथील गट क्रमांक ६ चे अध्यक्ष यांनी रितसर अर्ज सादर करून सदर चिन्ह आघाडीकरिता आरक्षित करण्याची विनंती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आली.
त्यानंतर “राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश २०२५” मधील तरतुदीनुसार शिट्टी हे निवडणूक चिन्ह इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी तात्पुरत्या स्वरूपात राजर्षी शाहू विकास आघाडीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे सदरचे शिट्टी चिन्ह अन्य कोणत्याही आघाडी किंवा अपक्ष उमेदवारांना वाटप करण्यात येणार नाही, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







