रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचा ४९ वा चार्टर डे उत्साहात
इचलकरंजी:
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे पन्नासाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या संस्थेचा ४९ वा चार्टर डे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष यांनी क्लबला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून रोटरी प्रांत ३१७० चे प्रांतपाल अरुण भंडारे, सौ माधवी भंडारे उपप्रांतपाल सुदर्शन कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतिडक यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले. आठवड्यातील कार्य पूर्तीचा आढावा सेक्रेटरी पिरगोंडा उर्फ राजू पाटील यांनी घेतला. फोरवे टेस्टचे वाचन क्लब सर्विस डायरेक्टर किरण पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख सुभाष तगडी यांनी करून दिली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन अभय येळरुटे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर रोटरी अंनसच्या अध्यक्षा सौ .मेघा येळरुटे व सेक्रेटरी सो. दिपा जठार उपस्थित होत्या .कार्यक्रमा वेळी प्रांतपाल अरुण भंडारे यांच्या हस्ते चार्टर्ड डेचा केक कापण्यात आला .पाहुण्यांच्या हस्ते यावेळी दिव्यांग व्यक्तीस तीन चाकी सायकल व दोन गरजू महिलांना त्यांच्या स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन प्रदान करण्यात आले. यासाठी किरण पाटील व सुशील माहेश्वरी यांनी आर्थिक मदत केली . रोटरीच्या ॲक्शन या बुलेटीनचे प्रकाशन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पास्ट प्रेसिडेंट महेंद्र मुथा, डी.एम. कस्तुरे ,गिरीश बदानी, डॉ. सुरेश नेगांधी ,अजित कुरडे, वसंत पाटील ,नेमिनाथ कोथळे, सुभाष तंगडी, संदीप तारे, महादेव खारगे, मनीष मुनोत, मुकेश जैन, मदनमोहन राठी, अभय यळरुटे, प्रकाश रावळ, सत्यनारायण धूत ,सुनील सातपुते , यांना भेटवस्तू देऊन यथोचित गौरव करण्यात आला. प्रांतपाल अरुण भंडारे भंडारे यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे कार्य नेहमीच आदर्शवत राहिले आहे. विविध समाज उपयोगी, कायमस्वरूपी उपक्रम राबवीत असल्याबद्दल गौरव उद्गगार काढले. तसेच त्यांनी ग्लोबल ग्रँड योजनेतून उपक्रम घ्यावे त्यासाठी सर्वतोपरी मदत करू असे सांगितले .उपप्रांतपाल सुदर्शन कदम यांचेही यावेळी शुभेच्छा पर मनोगत झाले. शेवटी कार्यक्रमाचे आभार अँनस अध्यक्षा सौ. मेघा यळरूटे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीनाक्षी तंगडी यांनी केले. कार्यक्रमावेळी रोटरीचे सदस्य अँनस ,निमंत्रित मोठ्या संख्येने हजर होते.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या चार्टर डे कार्यक्रम वेळी गरजूंना अपंग सायकल व शिलाई मशीन प्रदान कार्यक्रमा वेळी रोटरीचे प्रांतपाल अरुण भंडारे, सो. माधवी भंडारे, सुदर्शन कदम, रोटरीचे अध्यक्ष संजय घायतिडक ,सेक्रेटरी राजू पाटील अभय यळरुटे ,सौ. मेघा यळरुटे ,किरण पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








