इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत एकूण ३६३ उमेदवारी अर्जांची विक्री.
इचलकरंजी:
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असून बुधवार २४ डिसेंबर २०२५ अखेर एकूण ३६३ अर्जांची विक्री झाल्याची माहिती मिडिया व संपर्क व्यवस्थापन विभागाने दिली.
आजच्या दिवशीच विविध प्रभाग समिती कार्यालयांतून २०१ अर्जांची विक्री झाली. त्यापैकी प्रभाग समिती कार्यालय अ — ७९, ब — ४९, क — २७ आणि ड — ४६ अर्जांची नोंद झाली. मात्र, आजच्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही असून दाखल अर्जांची स्थिती ‘निरंक’ अशी आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







