ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक : उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वबळावर लढणार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक : उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वबळावर लढणार

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2025-26 पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवशाहू विकास आघाडीबरोबरच्या चर्चेत निष्ठावंत शिवसैनिकांना सन्मानजनक जागा न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आघाडीकडे 15 जागांची मागणी केली असताना केवळ दोनच जागांचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे शिवसैनिकांची बोळवण झाल्याची भावना व्यक्त होत असून, स्थानिक पातळीवरील मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचा विचार करून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे चौगुले यांनी सांगितले.
संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच हा निर्णय अधिकृत करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी किंवा आघाडीशी युती न करता, कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या बळावर आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जिल्हाप्रमुखांनी नमूद केले.
या निर्णयामुळे शिवशाहू विकास आघाडीला धक्का बसला असून आगामी निवडणूक समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा