इमनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करणेत आलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
इचलकरंजी
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ चे अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्ती केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे तसेच प्रत्यक्ष ई.व्हि.एम. हाताळणी (Hands On Trainning) प्रशिक्षणाचे आयोजन डि. के. टी. ई इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यु. कॉलेज, इचलकरंजी येथे शनिवार दि. २७ डिसेंबर आणि रविवार दि.२८ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते १.०० आणि दुपारी २ ते ६ अशा दोन सत्रात निवडणुक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करणेत आले होते.
सदर प्रशिक्षणा दरम्यान निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांनी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काटेकोरपणे निवडणूक कामकाजाची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले. त्याचबरोबर ई. व्हि. एम. हाताळणी प्रशिक्षणाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना ई. व्हि.एम. हाताळणी बाबत आवश्यक मार्गदर्शन केले.
सदर दोन दिवसांच्या प्रशिक्षणास इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रिय अधिकारी तसेच प्रत्यक्ष मतदाना दिवशी नियुक्त करणेत आलेले जवळपास १३५० अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
सदर प्रशिक्षण एल.ई.डी. स्क्रीनवर पी.पी.टी.च्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण, बाबासाहेब वाघमोडे,ओमप्रकाश यादव आणि प्रशिक्षण विभागाचे नोडल अधिकारी विजय राजापुरे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







