इचलकरंजीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वाढता प्रतिसाद; आजपर्यंत ६५ अर्ज दाखल
इचलकरंजी, ता. २९
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आज सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मिडिया व संपर्क व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विविध प्रभाग कार्यालयांमध्ये एकूण ६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
प्रभाग समिती कार्यालय ‘अ’ येथे १४ अर्ज, ‘ब’ येथे १८ अर्ज, ‘क’ येथे १३ अर्ज तर ‘ड’ प्रभाग कार्यालयात १८ अर्ज दाखल करण्यात आले. आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची एकूण संख्या ६५ वर पोहोचली आहे.
आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









