ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत निष्ठावंतांची नाराजी रोखण्याचे भाजपसमोर आव्हान विशेष वृत्त-अभिजित पटवा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत निष्ठावंतांची नाराजी रोखण्याचे भाजपसमोर आव्हान

विशेष वृत्त-अभिजित पटवा 

इचलकरंजी : 
इचलकरंजी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपकडे तब्बल ५२ जागांवर उमेदवारीची संधी असताना, एकूण ४२९ इच्छुकांकडून अर्ज दाखल झाल्याने तिकीट वाटपात मोठी कसरत निर्माण झाली आहे. शेवटपर्यंत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करता, थेट निरोप देत एबी फॉर्म वाटप करण्याची वेळ आल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षासाठी वर्षानुवर्षे निष्ठेने आणि तळागाळात काम केलेल्या अनेकांना यावेळी तिकीट न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काहींनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, तर काही जण इतर आघाड्यांमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, “सर्वांनी कामाला लागा” असा संदेश पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आला असला तरी, नाराज कार्यकर्ते मात्र निर्णय मागे घेण्याच्या भूमिकेत दिसत नाहीत. नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेण्याची गरज असताना, ठोस हालचाल न झाल्याने असंतोषात आणखी वाढ होत असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असून, याचा निवडणूक समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोशल मिडियावर संताप
भाजपच्या निष्ठावंत पुनम जाधव यांनी तळागाळात काम केले त्याना तिकीट मिळणार अशी शक्यता असताना तिकीट न मिळाल्याने भागातील महिलांनी रस्ता रोको करत नाराजी व्यक्त केली.मंगळवार पेठ येथील अश्विनी कुबडगे यांनी इतर प्रभागातील उमेदवार आणून तिकीट कापल्याने सोशल मिडियाद्वारे आपली नाराजी उघड व्यक्त केली आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा