ICHMH51NEWS.IN
9921600800

पत्रलेखक आदर्श सामाजिक कार्यकर्ता व प्रबोधकाची भूमिका बजावतो-प्रसाद कुलकर्णी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रलेखक आदर्श सामाजिक कार्यकर्ता व प्रबोधकाची भूमिका बजावतो-प्रसाद कुलकर्णी

इचलकरंजी ता.६

जबाबदारीने वृत्तपत्र पत्रलेखन करणारे पत्रलेखक जागरूक नागरिक, आदर्श सामाजिक कार्यकर्ता व प्रबोधकाची भूमिका उत्तमप्रकारे आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीतून बजावू शकतात. वृत्तपत्रातील पत्रलेखन हे परिवर्तनाचे एक मोठं साधन आहे. आज समाजजीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये वाढती आव्हाने उभी राहत आहेत. व्यवस्थेपेक्षा दुरावस्थेचे प्रमाण मोठे आहे. अशावेळी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा व्यापक विचार वृत्तपत्र पत्रलेखकांनी स्वीकारला पाहिजे.  वृत्तपत्र पत्रलेखनाद्वारे पत्रकारितेमध्ये करिअर  करण्याची संधी मिळू शकते. त्या संधीचा लाभ विद्यार्थिनींनी घ्यावाअसे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले ते श्रीमती आ. रा.पाटील कन्या महाविद्यालय समाजवादी प्रबोधिनी आणि वृत्तपत्र लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ” वृत्तपत्रातील पत्रलेखन” या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम होत्या. यावेळी  श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब राजमाने आणि प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष अरुण काशिद यांचा शाल, श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.मंचावर इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे, ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे, मराठी विभाग प्रमुख व कार्यक्रमाच्या संयोजक डॉ.अनिता आंबोकर, डॉ.वर्षा पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी वृत्तपत्र सृष्टीचा इतिहास, त्यातील वृत्तपत्र पत्रलेखनाचे महत्त्व आणि पत्रकारितेतील संधी याविषयी सविस्तर मांडणी केली.प्रारंभी अरुण काशिद व बाबासाहेब राजमाने यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत व प्रस्थापित डॉ.अनिता आंबोकर यांनी केले. अरुण काशीद व बाबासाहेब राजमाने यांनी मनोगते व्यक्त केली. प्राचार्य डॉ.त्रिशला कदम यांनी पत्रलेखनाचे महत्त्व आणि पत्रकारितेतील संधी सांगत अध्यक्षीय समारोप केला. प्रा. भारती कोळेकर यांनी आभार मानले. प्रा. प्रतिभा पैलवान यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विक्रम खांडेकर, महेंद्र जाधव , मनोहर जोशी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कन्या महाविद्यालयात मार्गदर्शन करताना प्रसाद कुलकर्णी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा