ICHMH51NEWS.IN
9921600800

कोल्हापूरप्रमाणे इचलकरंजीचा पाणीप्रश्न एका वर्षात सोडवणार- आ.सतेज पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापूरप्रमाणे इचलकरंजीचा पाणीप्रश्न एका वर्षात सोडवणार- आ. सतेज पाटील

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ व ३ मधील शिव–शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार सतेज पाटील यांनी इचलकरंजी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एका वर्षात कायमस्वरूपी सोडवण्याचे ठाम आश्वासन दिले.
यावेळी बोलताना आ. सतेज पाटील म्हणाले की, इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिव–शाहू विकास आघाडी कटिबद्ध आहे. शहराच्या विकासाची जबाबदारी सक्षम नेतृत्वाकडे असून, शिव–शाहू टिमच्या माध्यमातून शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. राज्यात अनेक वर्षे सत्तेत असतानाही महायुती सरकारला इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे शहरातील माता-भगिनींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले, अशी टीकाही त्यांनी केली.
कोल्हापूर शहरासाठी ज्या पद्धतीने थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करून पाणीप्रश्न सोडवण्यात आला, त्याच धर्तीवर इचलकरंजीसाठी प्रभावी योजना राबवली जाईल. येत्या एका वर्षात शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा शब्द मी तुम्हाला देतो, असा विश्वास आ. सतेज पाटील यांनी जनतेला दिला.
या प्रचारसभेला संजय कांबळे, धनाजी नाईक, राहुल पाटील, रमेश पाटील, बी. एम. आरगे, अशोक वाजे, आनंदा देशिंगे, संतोष काळगे, रतन वाजे, खंडू कांबळे यांच्यासह प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार उदयसिंह पाटील, सचिन राणे, रूपाली कोकणे, स्वाती लोखंडे तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार अविनाश वासुदेव, साजन बेंद्रे, सोफिया शेख, निर्मला शिरगावे उपस्थित होते. शिव–शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत बोलताना आ.सतेज पाटील

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा