इचलकरंजी महापालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजवंदन समारंभ राजाराम स्टेडियमवर होणार
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी मुख्य ध्वजवंदन समारंभाचे आयोजन राजाराम स्टेडियम येथे करण्यात आले आहे. सकाळी ठीक १०.०५ वाजता आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. ध्वजारोहणानंतर शहरातील महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचे संचलन, विविध शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महानगरपालिका वाहन विभागाचे नावीन्यपूर्ण व चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. या मुख्य ध्वजवंदन समारंभासाठी नागरिकांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









