इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त विद्या कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा.आयुक्त रोशनी गोडे, सहा.आयुक्त रामचंद्र कांबळे, सहा .कर संकलन अधिकारी दिपक खोत, सदाशिव जाधव, संदीप जोशी, प्रदीप झमरी, प्रविण बुगड, सचिन शेडबाळे आदी उपस्थित होते.
लहुजी साळवे यांना अभिवादन करताना महापौर उदय धातूंडे,आयुक्त पल्लवी पाटील व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







