इचलकरंजीत शिवसेनेकडून राहुल गांधी यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन
इचलकरंजी:
दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, तसेच राहुल गांधी यांनी वारंवार देशाविरोधी विधाने केल्याचा आरोप आणि संसदेचे कामकाज चालू न देण्याच्या भूमिकेच्या निषेधार्थ इचलकरंजी येथे शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.
हातकणंगले लोकसभा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ‘मातोश्री’, इचलकरंजी येथे आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक तथा गटनेते इचलकरंजी महानगरपालिका मा. श्री रविंद्र माने यांनी केले. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनादरम्यान शिवसेना, महिला आघाडी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात विविध आशयाचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली. “रागा-देशवासियांची माफी मागा”, “नसेल बुद्धी तर एआय वापरा”, “देशद्रोही काँग्रेसचे करायचे काय, खाली डोके वर पाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. भारत मंडपम येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
याप्रसंगी माजी नगरसेवक श्री दिलीप मुथा, कोल्हापूर शिवसेना महानगरपालिका आघाडी जिल्हाप्रमुख सौ. वैशालीताई डोंगरे, इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सौ. रुपालीताई चव्हाण, हातकणंगले लाडकी सून योजना कक्ष प्रमुख सौ. ज्योत्सनाताई भिसे, तारदाळ शिवसेना ग्रामीण शहरप्रमुख श्री अमित दादा खोत, मा. संजय गांधी निराधार योजना सदस्य श्री जयप्रकाश भगत, मा. उपसरपंच खोतवाडी श्री गजानन दादा नलगे, तारदाळ शिवसेना युवासेना ग्रामीण शहराध्यक्ष श्री विशाल पोवार, श्री सर्जेराव पाटील, सौ. चित्राताई दुधाणे, सौ. संध्याताई माळवदे, सौ. श्रद्धाताई यवलुजकर, श्री विनायक यादव, श्री संदीप माने, श्री अमित शिरगुरे, श्री अमित लिपारे, श्री अभिजित डुब्बल, श्री विजय माळी तसेच शिवसेना, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनाद्वारे राहुल गांधी यांनी देशवासीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.
राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करताना शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने,दिलीप मुथा, वैशाली डोंगरे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







