ICHMH51NEWS.IN
9921600800

आधार संस्थेतर्फे पुरस्कारांची घोषणा; शनिवारी वितरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आधार संस्थेतर्फे पुरस्कारांची घोषणा; शनिवारी वितरण

इचलकरंजी-
सामाजिक कार्यात आणि उपक्रमात सदैव अग्रभागी असणाऱ्या येथील आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘आधार गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर, बैतुलमाल कमिटी अध्यक्ष लतिफ गैबान, आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबूब मुजावर, ईद फेस्टिवलचे उपाध्यक्ष नुरमहंमद बागवान, संस्था उपाध्यक्ष हारूण पानारी यांनी दिली.
कृष्णानगर येथील आधार लायब्ररी येथे शनिवार १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. त्याचबरोबर इफ्तार पार्टी आणि रमजान ईद निमित्त आधार बैतुलमाल कमिटीच्या वतीने याचदिवशी (१४ मार्च) समाजातील गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी संस्थेच्या वतीने डॉ. जावेद मुन्वर बागवान (वैद्यकिय), अॅड. रियाज बाबालाल मुल्ला (न्याय), जाफर रसुल मुजावर, इम्रान अब्दुलरहमान शेख (सामाजिक), शफिक  शमशुद्दीन मुल्लाणी, रफीक गुलाब मुल्ला, सौ. नाजिया एजाज नवाब (शैक्षणिक) व राजू अकबर काझी (उद्योग) यांची ‘आधार गौरव’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर सौ. शहनाज अरिफ मोमीन यांना ‘उत्कृष्ठ संचालक’ पुरस्काराने आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल बाबुमियाँ सिकंदर ढालाईत यांना ‘आधार विशेष’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण व खीर मसाला साहित्य वाटप समारंभास माजी आमदार सुरेश हाळवणकर प्रमुख पाहुणे असून महापौर उदय धातुंडे अध्यक्षस्थानी असणार आहेत. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी सौ. साजिदा मुजावर, युसूफ तासगांवे, फरीद मुजावर, झाकीर मुजावर, सलीम ढालाईत, बाळासाहेव मुजावर, बद्रेआलम देसाई, नुरमहंमद मुजावर, वाजिद तासगांवे, राबिया मुजावर, आसमा लाटकर आदी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा