ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी येथील मराठा मंडळ कार्यालय येथे श्री रामनवमी निमित्त आयोजित करण्यात आलेले विशाल हिंदू संमेलन उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी येथील मराठा मंडळ कार्यालय येथे श्री रामनवमी निमित्त आयोजित करण्यात आलेले विशाल हिंदू संमेलन उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न

इचलकरंजी
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी वसंत कॉलनी परिसरातील श्री राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या आरतीने झाली. यानंतर भक्तिमय वातावरणात शोभायात्रेला प्रारंभ झाला. दरम्यान, यावेळी बालचिमुकल्यांनी केलेल्या प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि भारतमातेच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले होते. तर हलगी च्या आणि जय श्रीरामच्या घोषणेच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. शोभायात्रेनंतर तांबे माळ येथील मराठा मंडळ सांस्कृतिक हॉलमध्ये श्री तुळजा भवानी महिला भजनी मंडळाच्या वतीने सुमधुर भजन संध्या सादर करण्यात आली. भजनांमुळे उपस्थितांमध्ये भक्तीभावाची एक लहर निर्माण झाली तर हिंदू समाजाची एकता टिकविणे, धार्मिक परंपरांचे दृढीकरण करणे आणि संघटित समाज जागृती घडवून आणणे या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नाथ संस्थानचे अधिपती प.पू. योगी संतोष उर्फ बाळ महाराज यांनी उपस्थितांना हिंदू धर्माचे महत्त्व, परंपरा आणि संस्कृती याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी समाजात एकता आणि सद्भाव टिकविण्याचे आवाहन केले. यानंतर सौ. भारतीताई चंगेडिया यांनी प्रबोधनपर विचार मांडत समाजातील महिलांची भूमिका अधोरेखित केली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग संघचालक भगतरामजी दौलतराम छाबडा यांनी समाज संघटन आणि राष्ट्रनिर्मिती याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ काबरा यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदकुमार जांगिड यांनी केले. या भव्यदिव्य विशाल हिंदू संमेलनाला परिसरातील नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. तसेच स्थानिक उद्योजक संजय खोत, रमेशचंद्र लाहोटी, युवराज बोने पाटील आणि अरुण बांगड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. एकूणच, धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे हे संमेलन उत्साहात पार पडले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा