ICHMH51NEWS.IN
9921600800

जयसिंगपूरमध्ये ‘नवसाचा जयसिंगपूर राजा चषक 2026’ बुद्धिबळ स्पर्धा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जयसिंगपूरमध्ये ‘नवसाचा जयसिंगपूर राजा चषक 2026’ बुद्धिबळ स्पर्धा

जयसिंगपूर:

चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व केन चेस अकॅडमीच्या सहकार्याने अरुणा सोशल फाउंडेशन, जयसिंगपूर यांच्या वतीने ‘नवसाचा जयसिंगपूर राजा चषक 2026’ या भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
बुद्धिबळ या बौद्धिक खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा बुधवार, दि. 5 मे 2026 रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी गल्ली क्र. 3, जयसिंगपूर येथे होणार आहे. स्पर्धा खुला गट व 14 वर्षांखालील गट अशा दोन विभागांत खेळविण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय पद्धतीने 7 फेऱ्यांमध्ये सामने पार पडतील.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. एकूण 70 बक्षिसे ठेवण्यात आली असून सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र तसेच दुपारच्या जेवणाची सोय आयोजकांकडून करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून करण परीट, वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ, राष्ट्रीय पंच मोहिनीराज डांगे, प्रशांत धनवडे तसेच राज्य पंच विजय सलगर हे काम पाहणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी दि. 3 मे 2026 पर्यंत आपली नोंदणी करावी. नोंदणी शुल्क 250 रुपये असून इच्छुकांनी 7720929992, 8483087479, 9822678565 या क्रमांकांवर किंवा ऑनलाइन नोंदणी करावी.
या स्पर्धेमुळे बुद्धिबळ खेळाची आवड वाढून नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सादर करण्याची उत्तम संधी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी प्रवीण राजोपाध्ये (मो. 9822678565) व रोहित पोळ (मो. 9657333926) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा