सील तोडून मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा; दोघांवर गुन्हा
इचलकरंजी:
करूर वैश्य बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचे सील व कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १८ एप्रिल रोजी संतमळा परिसरात घडली असून गुन्हा दि. ४ मे रोजी नोंदविण्यात आला.
फिर्यादी आशिष गंगाधरराव वडे (वय ३८), बँच मॅनेजर, करूर वैश्य बँक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गजानन पाटणकर व पुरुषोत्तम पाटणकर यांनी संगनमताने जिल्हाधिकारी आदेशाचा भंग करत सील तोडून फलक नष्ट केले व नोटिसा फाडून मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा घेतला.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोसई वाघमारे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

