इचलकरंजीत घरफोडी; २० हजारांची रोकड लंपास
इचलकरंजी :
लिगाडे मळा, जवाहरनगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरात शिरून २० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियांका अर्जुन रंगरेज (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० एप्रिल रात्री ९.३० ते १ मे सकाळी ६ दरम्यान त्यांच्या राहत्या घरात अज्ञात इसमाने प्रवेश करून किचन व हॉलमधील पर्समधून २० हजारांची रोकड लंपास केली. त्या वेळी कुटुंबीय झोपण्यासाठी टेरेसवर गेले होते.
या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

