कबनूरमध्ये बांधकाम साईटवरून २.१० लाखांच्या वायरची चोरी
इचलकरंजी, दि. ६ : कबनूर परिसरातील बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्याने सुमारे ₹२.१० लाख किमतीच्या वायरची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शामकांत श्रीपती सर्वगोडे (वय ५५, रा. पुजारी मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३० एप्रिल रात्री ९ ते १ मे सकाळी ७.१५ दरम्यान गंगामैया वाळू डेपोजवळ, गांधी विकासनगर, अलायन्स रोड, कबनूर येथील त्यांच्या बांधकाम साईटवरून आरआर वायर कंपनीच्या विविध जाडीच्या (१ मिमी ते ६ मिमी) वायर चोरून नेण्यात आल्या.
या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

