ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत कापड व्यवहारात 42.32 लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत कापड व्यवहारात ४२.३२ लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा

इचलकरंजी :
कापड खरेदी-विक्री व्यवहारातून ₹४२.३२ लाखांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाणे येथे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र पारसमल नहार (वय ६४, रा. इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे.
रघुनाथ खंडेलवाल, दिपचंद खंडेलवाल व दलाल जयप्रकाश करवा यांनी संगनमताने के.के. ग्रुप ऑफ टेक्सटाईल्स व एम.आर.के. टेक्स फर्ममधून मोठ्या प्रमाणावर कापड खरेदी करून परस्पर विक्री केली व रक्कम स्वतःजवळ ठेवून विश्वासघात केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी  गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळेकर करत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा