ICHMH51NEWS.IN
9921600800

व्यंगचित्रांच्या एका फटकाऱ्यात हजारो शब्दांचा प्रभाव; आलोक निरंतर यांचे प्रभावी मार्गदर्शन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

व्यंगचित्रांच्या एका फटकाऱ्यात हजारो शब्दांचा प्रभाव; आलोक निरंतर यांचे प्रभावी मार्गदर्शन

इचलकरंजी, ता. ६ :
आपटे वाचन मंदिराच्या वसंत व्याख्यानमालेत व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांनी “व्यंगचित्रांचे अलौकिक विश्व” या विषयावर घेतलेल्या मुलाखतीतून व्यंगचित्र कलेचा प्रभावी आणि विचारप्रवर्तक प्रवास उलगडला.
विचार पुष्प मालिकेतील तिसऱ्या व्याख्यानात ‘दैनिक सकाळ’ समूहाचे संपादकीय व्यंगचित्रकार असलेल्या निरंतर यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून अल्प शब्दांत प्रभावी संवाद कसा साधता येतो, याचे जिवंत उदाहरण रसिकांसमोर सादर केले. “हजारो शब्दांत सांगणे कठीण असलेला आशय कुंचल्याच्या एका फटकाऱ्यात मांडता येतो,” असे सांगत त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून व्यंगचित्र निर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवली.
व्यंगचित्रकार म्हणून घडताना आलेल्या अडचणी, त्यावर मात करण्याचा प्रवास आणि आपल्या वडिलांसह ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे मार्गदर्शन यांचा त्यांनी आदरपूर्वक उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे प्रायोजक जी. पी. पारसिक बँकेचे क्लस्टर हेड असिफ खान व व्यवस्थापक अन्वेष बांदे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय, मुलाखत आणि आभार प्रदर्शन संस्थेचे सहकार्यवाह प्रा. डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी केले. यावेळी कार्यवाह प्रा. मोहन पुजारी, मार्गदर्शक अशोकराव सौंदत्तीकर, ॲड. स्वानंद कुलकर्णी, संचालक मंडळ तसेच मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा