श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
इचलकरंजी :
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने उल्लेखनीय यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. दहावीचा निकाल ९७.३४ टक्के, बारावी कॉमर्स विभागाचा ९६.९१ टक्के तर आर्ट्स विभागाचा ९१.१५ टक्के निकाल लागला.
दहावी परीक्षेत बारा विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. शरयू राजेंद्र उरणे हिने ९७.६० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. अनन्या अजय वाटेगावकर हिने ९६ टक्के गुणांसह द्वितीय, तर वृद्धी विजय काकडे हिने ९५.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
याशिवाय शरयू उरणे हिने संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले, तर प्रांजली प्रताप जामदार हिने गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून विशेष प्राविण्य संपादन केले.
बारावी कॉमर्स विभागात श्रेया भीमगोंडा पाटील हिने ८३.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. आलिशा जावेद नदाफ व स्नेहल उदय हसुरे यांनी प्रत्येकी ७९.८३ टक्के गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय क्रमांक पटकावला, तर अलमास सुलेमान मिस्त्री हिने ७९.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
आर्ट्स विभागात गायत्री सिद्दू व्हकळे हिने ८१.६७ टक्के गुणांसह प्रथम, साक्षी सचिन ढोकळे हिने ८०.१७ टक्के गुणांसह द्वितीय, तर अक्षरा संतोष कांबळे हिने ७९.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
या यशासाठी श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोहरा शेठजी, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच मुख्याध्यापिका ए. एस. काजी, उपमुख्याध्यापिका व्ही. एस. लोटके, पर्यवेक्षक एस. एस. कोळी, पर्यवेक्षिका एन. एम. कांबळे, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना लाभल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








