ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीतील दोन सराईत गुन्हेगार कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील दोन सराईत गुन्हेगार कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

इचलकरंजी :
शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी इचलकरंजी उपविभागीय पोलिसांनी दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. शहापूर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार संबंधित आरोपींना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहापूर पोलीस ठाण्याकडून प्रकाश गोविंद आडके (रा. समर्थनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) याच्यावर खंडणीची मागणी, खुनाचा प्रयत्न, कोविड काळात लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघन तसेच गंभीर दुखापतीचे गुन्हे नोंद होते. त्यानुसार त्याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून किरण प्रकाश जगदाळे (रा. जुना चंदूर रोड, परीट गल्ली, इचलकरंजी) याच्यावर मारामारी, जमावाकडून दुखापत करणे तसेच चोरीचे गुन्हे दाखल होते. त्याला एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
संबंधित पोलीस ठाण्यांनी दोन्ही गुन्हेगारांच्या गुन्हे अभिलेखांची पडताळणी करून हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी करून अहवाल उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी शिंदे यांनी अंतिम आदेश पारित केले.
सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज पोलीस अंमलदार सागर हारगुले, साजिद कुरणे आणि पवन गुरव यांनी पाहिले. संबंधित आरोपींवर शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून परिसरात त्यांची दहशत होती. या कारवाईमुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा