जितो लेडीज विंग इचलकरंजीतर्फे ‘उडाण शॉपिंग फिएस्टा २०२६’चा भव्य शुभारंभ
इचलकरंजी:
जितो लेडीज विंग इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित द्विदिवसीय ‘उडाण शॉपिंग फिएस्टा २०२६’ या उपक्रमाचा भव्य शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महिला उद्योजकता, स्वावलंबन आणि व्यावसायिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उद्घाटन सोहळ्यास कोल्हापूर लेडीज विंगच्या अध्यक्षा माया राठोड, सचिव स्वीटी परमार, फॉर्च्यूनच्या संचालिका रूपल शहा, जितो चॅप्टरचे अध्यक्ष महावीर बागरेचा व मुख्य सचिव मुकेश पुनमिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा उषा बोहरा, मुख्य सचिव शैली जैन, खजिनदार मुग्धा शाह, जितो युवा विभागाचे अध्यक्ष अक्षय बालार, ‘उडाण’ संयोजिका शशी सिंघवी, कार्यक्रम संयोजिका सपना शाह व सहसंयोजिका नीता बोरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात णमोकार महामंत्राच्या मंगल उच्चारणाने झाली. स्वागतपर भाषणात उषा बोहरा यांनी ‘उडाण’ हा केवळ शॉपिंग फिएस्टा नसून महिलांच्या कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकीय क्षमतेला नवे व्यासपीठ देणारा उपक्रम असल्याचे सांगितले.
प्रदर्शनात फॅशन, जीवनशैली, दागिने, गृहसजावट, खाद्यपदार्थ तसेच विविध व्यावसायिक उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. स्थानिक महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रभावी सादरीकरण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री जोगड यांनी केले तर शेवटी मुख्य सचिव शैली जैन यांनी आभार मानले.
उद्घाटन प्रसंगी उषा बोहरा, महावीर बागरेचा,मुकेश पुनमिया व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







