ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी क्लब इचलकरंजी तर्फे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात ४० रुग्णावर शस्त्रक्रिया 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी क्लब इचलकरंजी तर्फे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात ४० रुग्णावर शस्त्रक्रिया 

इचलकरंजी :
 येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आयोजित व इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी रोटरी अँनस, श्री. दगडूलाल मर्दा चारिटेबल अँड रिसर्च फाउंडेशन ,गिरीराज मदनगोपाल मोहता, मिठालालजी महावीर कुमारजी अरुण कुमारजी लुंकड, गोयंका फाउंडेशन ,समर्थ फौंड्री सर्विस हातकणगले, फॉर्च्यून -शहा ग्रुप, रोटरी डिस्ट्रिक्ट 31 70 ट्रस्ट यांच्या वतीने व इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आयजीएम) इचलकरंजी यांच्या सहकार्याने इचलकरंजी शहरात दर वर्षी प्रमाणे  इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे दिनांक 19 व 20 जून रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर संपन्न झाले. यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या 40 रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
या प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट 31 70 चे प्रांतपाल इंजि. अरुण भंडारे तसेच डॉ. दिलीप माने( उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ ,कोल्हापूर ),डॉ. सरिता थोरात,( जिल्हा शल्य चिकित्सक ,कोल्हापूर ),प्लास्टिक सर्जन डॉ. सुरेंद्रजी बजाज (दिल्ली )रोटरीचे उपप्रांतपाल सुदर्शन कदम ,आयजीएम चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ ,रोटरीचे अध्यक्ष संजय घायतिडक ,सेक्रेटरी राजू पाटील, रोटरी अँनसच्या अध्यक्षा सौ .मेघा येळरूटे, इनरव्हील क्लबच्या पुढील वर्षाच्या अध्यक्षा सौ.मुग्धा शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करणारे डॉ. राजेंद्र गांधी ( पुणे ),डॉ. हिरेन भट्ट (बडोदा), डॉ. पियुष दोशी (बडोदा) डॉ. निलेश पाटोदरा (राजकोट), डॉ. अभिषेक घोष( पुणे ),डॉ. गझल बेन पटेल ,(बडोदा) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व डॉक्टर्स व उपस्थितांचे  स्वागत रोटरीचे अध्यक्ष संजय घायतिडक यांनी केले .उपक्रम प्रमुख ऋषीं  मोहनका यांनी शिबिराची माहिती आपल्या प्रास्ताविकात करून दिली .रोटरीचे प्रांतपाल इंजि. अरुण भंडारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या पुढाकाराने व विविध संस्था, दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने इचलकरंजी व परिसरातील रुग्णाकरीता सलग 24 वर्ष यशस्वीरित्या आयोजित केलेल्या प्लास्टिक सर्जरी शिबिरातील व्यक्तींच्या आयुष्यात सुखद बदल आणणाऱ्या या  सेवेचा फायदा पश्चिम महाराष्ट्र ,कर्नाटकातील गरीब रुग्णांना होत आहे. याबद्दल रोटरी क्लब  इचलकरंजीचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. यावेळी डॉ. सुरेंद्र जी बजाज, डॉ. दिलीप माने , डॉ. सरिता थोरात, सुदर्शन कदम यांनी शुभेच्छा पर मनोगते व्यक्त केली. यावेळी प्लास्टिक सर्जरी शिबिरास सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचा सत्कार पाहुण्यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमा वेळी सुनील सातपुते, डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल, प्रकाश गौड, नेमिनाथ कोथळे, वसंत पाटील ,महेंद्र मुथा, गिरीराज मोहता, अजित कुरडे,पंकज कोठारी सत्यनारायण धूत, महेश दाते, गिरीश बदानी, सुनील यळरुटे, सुभाष तंगडी, सुहास पाटील राजाराम जाधव अभय यळरुटे यांच्यासह बहुसंख्य रोटरीयन्स ,अँनस, देणगीदार शिबिराथीर्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सेक्रेटरी राजू पाटील यांनी मानले, सूत्रसंचालन अभिनंदन देशमुख यांनी केले.
दोन दिवस चाललेल्या या शिबिरात विविध भागातून शिबिराकरीता 125 रुग्णांनी भाग घेतला होता. या सर्वांची पूर्व प्राथमिक तपासणी करून प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया करिता 40 रुग्णावर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. यामध्ये ओठ ,टाळू ,भाजलेले व्यंग चेहऱ्याची विदृपता जुळलेली बोटे, स्नायूंचा आखडलेपणा, लहान मुलांचे लघवीचा बदललेला मार्ग इत्यादी प्रकारच्या रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्ण मोफत करून त्यांना संजीवन देण्याचे कार्य रोटरीच्या माध्यमातून करण्यात आले. या शिबिरा करीता इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील सर्व स्टाफचे बहुमोल सहकार्य लाभले.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी च्या वतीने मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन करताना रोटरीचे प्रांतपाल अरुण भंडारे ,डॉ. दिलीप माने, डॉ. सरिता थोरात ,डॉ. सुरेंद्रजी बजाज, डॉ. संतोष पोळ रोटरीचे अध्यक्ष संजय घायतिडक, सेक्रेटरी राजू पाटील, सुदर्शन कदम, ऋषी मोहनका, सौ. मेघा येळरूटे ,सौ. मुग्धा शहा उपस्थितीत होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा